स्मिता गोंदकर

स्मिता गोंडकर हिने विविध राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत कर्णधार म्हणून ‘महाराष्ट्र राज्य कायाकिंग’ संघाचं प्रतिनिधीत्व केलं होतं. तिने गोवा येथील ‘नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ वॉटर स्पोर्ट्स’मधील सदस्यांना भेट दिली, जिथे तिने ‘व्हाईट वॉटर कायाकिंग’ मोहिमेसाठी प्रशिक्षण घेतलं होतं. कॉलेजमध्ये असताना स्मिता राज्यस्तरीय पातळीवर ‘स्कलकिंग आणि रोईंग’ जिंकली आणि शाळेत असताना राज्यस्तरीय पातळीवर पोहणे आणि नॅशनल ज्युडोमध्ये सहभागी झाली होती. तसेच स्मिताला डर्ट ट्रॅक रेसिंग आणि स्काय डायविंगची आवड आहे. लहानपणापासून स्मिताला अभिनयाची आवड होती. शाळेत असताना विविध नाटक आणि रॅम्प शोमध्ये तिने सहभाग घेतला. फूड अँड बेवरेज डिपार्टमेंट स्टाफचे पण प्रशिक्षण तिने घेतले. नंतर तिला मॉडलिंगसाठी ऑफर आली आणि त्यानंतर काही चित्रपट मिळाल्यामुळे तिने तिच्या अभिनयाच्या आवडीकडे लक्ष दिलं.

जन्मतारिख: 1985-11-05( वय- 34)

टोपण नाव: स्मिथा

स्टेटस : सिंगल

जन्म ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र, भारत