अभिनेत्री सायली भगत करणार मराठीत पदार्पण

 

 

माजी ‘मिस इंडिया’ अभिनेत्री सायली भगत बॉलिवूडमध्ये झळकल्यानंतर आता मराठीत दमदार पुनरागमन करतेय. ’द ट्रेन’, ‘यारिया’ या हिंदी सिनेमांमधून अभिनयाची चुणूक दाखवल्यानंतर ती मराठी सिनेमासाठी सज्ज झालीय.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सायली आगामी मराठी सिनेमा ‘यली’मध्ये प्रमुख भूमिका साकारतेय. सिनेमात तिची व्यक्तिरेखा एका तडफदार पोलिस अधिका-याची असल्याचं बोललं जात आहे. तेव्हा, आता बोल्ड आणि ब्युटीफुल मिस इंडियाची मायबोलीतील हा सिनेमा पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.