अक्षर कोठारी प्रियांका चोप्राच्या आगामी चित्रपटात दिसणार का?

 

२०१६ मध्ये झी स्टुडियो ची निर्मिती असलेल्या ‘व्हेंटिलेटर’ चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रियांका चोप्राने प्रेक्षकांचे पुन्हा एकदा मन जिंकले.

धमाल कौटुंबिक विनोदी शैलीतून जोडले जाणारे भावबंध यांच चित्र ‘व्हेंटिलेटर’ या चित्रपटातून रेखाटल्यानंतर आता प्रेक्षकांना मनमुराद हसवण्यासाठी प्रियांका चोप्रा ‘काय रे रास्कला’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस आणणार आहे. या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पार पडला.

यावेळी या चित्रपटात अभिनेता गौरव घाटणेकर या कलाकाराची महत्त्वाची भूमिका आहे असं तुम्हांला सांगण्यात आलं होतं. पण आता आम्ही तुम्हांला आणखी एका कलाकाराविषयी सांगणार आहोत.  असं म्हंटलं जातंय की अभिनेता गौरव घाटणेकर याच्यासह अभिनेता अक्षर कोठारी देखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. अक्षरच्या चाहत्यांसाठी ही खुषखबर नक्कीच असेल.

पर्पल पेबल पिक्चर्स निर्मित आणि गिरीधरन स्वामी दिग्दर्शित ‘काय रे रास्कला’ या चित्रपटाची निर्मिती प्रियंका चोप्रा आणि डॉ. मधु चोप्रा यांनी केली असून संगीता स्वामी आणि डॉ. सत्यशील बिरदार या चित्रपटाचे सह-निर्माते आहेत.