राधिका, श्रिया नंतर ‘कास्टिंग काऊच विथ अमेय अँड निपुन’ मध्ये कोणाचा नंबर?

 

राधिका आपटेच्या पहिल्या एपिसोडनंतर दुस-या एपिसोडमध्ये 'कास्टिंग काऊच विथ अमेय अँड निपुन' यामध्ये श्रिया पिळगावकर होती. अमेय वाघ आणि निपुन धर्माधिकारी यांच्या सोबतची धमाल पाहताना प्रेक्षकांना मजा येते. अर्थात हा सर्वांचा लाडका शो बनला आहे.

अमेय आणि निपुन दोघांनी श्रियाची खेचायची पूर्ण तयारी केली होती पण श्रियासुध्दा त्यांच्या इतकीच स्मार्ट निघाली. फॅन चित्रपटातील श्रियाच्या भूमिकेमुळे अमेय आणि निपुनचा तो चर्चेचा विषय बनला होता.

हा मराठीतला एकमेव ऑनलाईन शो आहे आणि या शोचं दिग्दर्शन सारंग साठेने केले आहे. या शोचा फॅन वर्गही वाढला आहे. एक वेगळ्या पठडीचा विनोद या शो मध्ये आहे. अशा प्रकारचा विनोद आपल्याला जरी अनोळखी असला तरी त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय.  आता प्रेक्षक आतुर आहेत हे जाणून घेण्यासाठी की पुढील एपिसोडमध्ये अमेय आणि निपुनच्या तावडीत कोण सापडणार?