नागराज मंजुळेच्या सिनेमात बिग बी

 

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या सिनेमाने २०१६ मध्ये प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले होते. बरं इतकच नाही तर, या सिनेमाने आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील भरभरून यश मिळविले आहे. या सिनेमातील रिंकु राजगुरू आणि आकाश ठोसर यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर नाव कमावले आहे. अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेली या सिनेमातील गाणीदेखील आजही प्रेक्षकांच्या ओठावर आहेत. म्हणूनच बॉलिवूडमधील कलाकार पण या सिनेमाच्या प्रेमात पडले आहेत. या सिनेमाचा मोह बॉलिवूडचे बिग बी अर्थातच अमिताभ बच्चन यांना देखील आवरला नाही.

नुकतेच अमिताभजी यांनी सोशल मीडियावरून या सिनेमाचे कौतुक केले आहे आणि आनंदाची बातमी म्हणजे नागराज मंजुळे यांच्या आगामी सिनेमात बिग बी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.  ते कसे असा प्रश्न तुम्हांला पडला असेल ना? नागराज मंजुळे सध्या एका हिंदी सिनेमामध्ये व्यस्त असल्याचे कळते. आणि बरं का हा दुसरा तिसरा सिनेमा नसून ‘सैराट’चा रिमेकच नागराज मंजुळे करत असल्याचे समजते  आहे. करण जोहरची निर्मिती असलेल्या या सिनेमात खुद्द बिग बी काम करत असून नागराज आणि बिग बी पहिल्यांदाच एकत्र काम करत करणार आहे असे बोलले जात आहे. त्यानिमित्ताने बिग बी नी काही दिवसांपूर्वीच ‘सैराट’ पाहिला असल्याची कुजबूज सिनेसृष्टीत पसरली आहे.

‘सैराट’च्या या रिमेकमध्ये आर्चीची भूमिका श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर परश्याची भूमिका शाहीद कपूरचा भाऊ इशान साकारणार आहे. मात्र बिग बी कोणत्या भूमिकेत असणार आहे हे अजून गुलदस्त्यात असले तरी या सिनेमाच्या अजून माहितीसाठी www.marathidhamaal.com ला फॉलो करा.