फुलले फुलवाचे सुंदर स्वप्न पूर्ण

 

आपण ज्या क्षेत्रात काम करत असतो त्या क्षेत्राशी निगडीत आपली एक इच्छा असते की आपलं ऑफिस असं असावं, आपल्याकडे आपल्या मेहनतीचं विशेष असं काहीतरी असावं. आणि आपण काम करत असलेलं क्षेत्र हे आपल्या आवडीचं असेल तर बात ही कुछ और है.

आज आम्ही तुम्हांला अशा एका सेलिब्रिटीविषयी सांगणार आहोत जे प्रेक्षकांना मनापासून आवडेल.  मराठी सिनेसृष्टीतील कोरिओग्राफर फुलवा खामकर हे नाव सर्वांना माहित आहे. फुलवा खामकरच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच १७ सप्टेंबरला फुलवाचे डान्स स्टुडियोचे स्वप्न पूर्ण झाले. 

कोरिओग्राफर म्हणून नृत्य करण्यासाठी स्वत:ची जागा असणे हे खूप महत्त्वाचे असते आणि आपल्या कोरिओग्राफर फुलवाचे पण असेच स्वप्न होते की आपला स्वत:चा पण डान्स स्टुडियो असावा. 

फुलवाचे हे स्वप्न पूर्ण झाले आणि तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिच्या डान्स स्टुडियोचे ओपनिंग करण्यात आले. यावेळी मराठी सिनेसृष्टीतील बरीचशी कलाकार मंडळी फुलवाच्या आनंदात सहभागी झाले होते. 

फुलवाच्या डान्स स्टुडियोचे नाव आहे ‘फुलवाज स्कूल ऑफ डान्स अँड जिमनॅस्टिक्स’ (Phulawa’s School Of Dance And Gymnastics).

http://www.marathidhamaal.com/  तर्फे फुलवा खामकरचे खूप खूप अभिनंदन!