खरंच...उमेश आणि तेजश्री एकत्र?

 

खरचं....उमेश कामत आणि तेजश्री प्रधान एकत्र? पण कशासाठी?

‘टाईम प्लीझ’, ‘लग्न पहावे करून’, ‘बाळकडू’, ‘ए पेईंग घोस्ट’, ‘मुंबई टाईम’ या सिनेमांतून तसेच ‘आभाळमाया’, ‘ऋणानुबंध’, ‘वादळवाट’, ‘असंभव’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ या मालिकेंतून घराघरांत पोहचलेला उमेश कामत सध्या एका नवीन प्रोजेक्टसाठी वर्कशॉप घेत असल्याचे समजत आहे. उमेश बरोबर तेजश्री प्रधान देखील या प्रोजेक्टसाठी वर्कशॉप घेत असल्याचे समजते. नुकताच सोशल मिडियावर या दोघांचा एक फोटो उमेशने शेयर केला आहे.

‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतील जान्हवी म्हणजेच तेजश्री प्रधानने तिची एक वेगळीच जागा प्रेक्षकांच्या मनात करून ठेवली आहे. नुकताच तेजश्री ‘ती सध्या काय करते’ मधून तुम्हांला पाहायला मिळाली होती. प्रेक्षकांना तेजश्रीची ह्या सिनेमातील भूमिका फार आवडली.

आता तेजश्री आणि उमेश सज्ज झाले आहेत त्यांच्या नवीन प्रोजेक्टसाठी. उमेशने शेयर केलेल्या या फोटोमध्ये सुश्रूत भागवत देखील आहेत. उमेशने या अगोदर सुश्रूत भागवत यांच्याबरोबर ‘मुंबई टाईम’ या सिनेमात काम केले होते. प्रेक्षकांना नवीन कथा, नवीन जोडी पाहायला तर नेहमीच आवडते. चला तर मग या दोघांना त्यांच्या आगामी प्रोजेक्टसाठी शुभेच्छा देऊया.

 फॉलो : http://www.marathidhamaal.com/