‘असे हे कन्यादान’चा प्रेक्षकांना निरोप

 

छोट्या पडद्यावर सारा टीआरपीचा खेळ सुरू असतो. प्रेक्षकांच्या आवडी-निवडीला तेथे थारा नसतो. कधी कधी रटाळ मालिका वर्षानुवर्ष चालतात तर कधी सुंदर कथानकक असलेल्या मालिका मर्यादित भागातच संपविण्यात येतात. हे टीआरपीचं गणित प्रेक्षकांना पचवणं मात्र कठीण जातं.

वडील-मुलीच्या नात्यावर आधारित ‘असे हे कन्यादान’ ही झी मराठीवरील मालिका अवघ्या काही महिन्यांपूर्वीच सुरू झाली होती. सूत्रांच्या माहितीनुसार प्रेक्षकांच्या अल्प प्रतिसादामुळे ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. कौटुंबिक मालिका असली तरी टीआरपीच्या रेसमध्ये ती मागे पडत असल्याने निर्मात्यांनी ती बंद करण्याचा निर्णय घेतलाय.

 ‘असे हे कन्यादान’ची जागा आता ‘नांदा सौख्य भरे’ ही नवी मालिका घेणार आहे.