‘बंध नायलॉनचे’ जोडी सुबोध आणि श्रृती पुन्हा एकदा एकत्र

 

एखाद्या मराठी चित्रपटातील कलाकारांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना नवीन कोणत्या ना कोणत्या प्रकल्पातून दिसावी असं अनेकांना वाटत असतं. अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री श्रृती मराठे या कलाकारांची जोडी प्रेक्षकांनी ‘बंध नायलॉनचे’ या चित्रपटांतून अनुभवली होती. आता प्रेक्षकांचे दुप्पट मनोरंजन करण्यासाठी ही जोडी पुन्हा एकदा नव्या मराठी चित्रपटांतून येणार आहे.

नुकताच अभिनेत्री श्रृती मराठेने सोशल मिडीयावर तिचा आणि सुबोध भावेचा फोटो अपलोड केला आहे आणि “एक नवीन चित्रपट, नवीन दिवस पण तोच जुना मित्र #दुबई” असं कॅप्शन श्रृतीने दिलं आहे. हॅशटॅग दुबई म्हणजे बहुदा त्यांच्या चित्रपटाचे शूटिंग दुबई मध्ये होणार आहे.

आगामी मराठी चित्रपटातील सुबोध भावेचा नवीन लूक-

http://www.marathidhamaal.com/  तर्फे सुबोध भावे आणि श्रृती मराठे यांना त्यांच्या आगामी चित्रपटासाठी अनेक शुभेच्छा!