‘चीटर’ येतोय १० जूनला प्रेषकांच्या भेटीला

 

‘चीटर’ या चित्रपटाच्या नावावरुनच प्रेषकांना या चीटरला पाहायची जास्त घाई झाली आहे. नक्की हा चीटर करतो काय, कसं आणि कोणाला चीट करतो आणि नेहमीच सर्वांना आवडणारी गोष्ट म्हणजे लव्ह स्टोरी; कशी असेल चीटरची लव्ह स्टोरी? या सर्व गोष्टींचा उलगडा होणार आहे येत्या १० जून रोजी.

या चित्रपटाच्या नावावरुन चित्रपटाच्या कथेचा एक अंदाज येतो पण दिग्दर्शकाने यामध्ये एक वेगळेपण जपले आहे. नक्कीच चीटर हा प्रेषकांचे मनोरंजन करेल.

स्वीस एन्टरटेनमेंट प्रा. लि. प्रस्तुत ‘चीटर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अजय फणसेकर यांनी केले आहे. या अगोदर त्यांनी ‘रात्र आरंभ’ ‘एनकाऊंटर’, यही है जिंदगी  "एक होती वादी', रामचंद्र पुरुषोत्तम जोशी’ हे चित्रपट दिग्दर्शित केले होते.  तसेच या चित्रपटाचे कथा, पटकथा, संवाद देखील अजय फणसेकर यांनीच लिहिले आहे आणि बी. लक्ष्मण ह्यांनी  या सिनेमासाठी कॅमेरामन म्हणून काम पहिले आहे. अभिनेते हृषीकेश जोशी, वैभव तत्ववादी, अभिनेत्री आसावरी जोशी, सुहास जोशी आणि पूजा सावंत  आदी कलाकारांची यामध्ये प्रमुख भूमिका आहे. 
तर असा हा आगळा वेगळ्या धाटणीचा "चीटर" सिनेमा येत्या १० जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.