संस्कृती झाली बोल्ड

 

'पिंजरा' या मालिकेतून घराघरांत पोहचलेली संस्कृती आता मराठी इंडस्ट्रीत चांगलीच रूळली आहे.'सांगतो ऐका' या सिनेमात संस्कृतीच्या जबरदस्त लावणीने तडका दिला. यानंतर तर मॅडमचा भाव भलताच वधारलाय. अनेक प्रोजेक्ट्समध्ये ती सध्या काम करतेय.

‘शॉर्टकर्ट’ या नव्या सिनेमात संस्कृती वैभव तत्ववादीबरोब झळकणार आहे. हरिश राऊत दिग्दर्शित‘शॉर्टकर्ट’हा सिनेमा सायबर क्राईम सारख्या गंभीर विषयावर बेतला आहे. पण महत्त्वाचं म्हणजे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संस्कृतीने बोल्ड सीन्स दिलेत. त्यामुळे इंडस्ट्रीत सर्वत्र या बोल्ड सीन्सची आणि बोल्ड संस्कृतीची चर्चा सुरू आहे.

चर्चेतलं हे तथ्य आपल्याला सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच कळेल.