भूषण-प्रार्थनाची जमली जोडी

 

अभिनेता भूषण प्रधान आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे ही फ्रेश जोडी एका आगामी सिनेमात झळकतेय. यापूर्वी ‘कॉफी आणि बरंच काही’या सुपरहीट सिनेमात हे दोघे एकत्र दिसले होते. नुकतंच दोघांनी एक धमाल मूडमध्ये मस्त सेल्फी काढलाय. यावरूनच ही जोडी चांगलीच जमलेली दिसतेय. सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण झालं असून या नव्या जोडीची सर्वत्र उत्सुकता आहे.