In Pics: ‘पोश्टर गर्ल’सोनाली एन्जॉयींग दुबई

 

आपल्या बिझी शेड्यूलमधून दोन-चार दिवस निवांत घालवण्यासाठी सारेच धडपडत असतात. सेलिब्रिटींनासुध्दा शूटींगमधूमन एक छानसा हॉलिडे ब्रेक घेणं मस्टच असतं. असाच एक मस्त ब्रेक सिनेसृष्टीतील बोल्ड आणि ब्युटिफुल 'पोश्टर गर्ल' फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने घेतला आहे. सध्या ती आपले नातेवाईक व मित्रमंडळींसोबत दुबईची अफलातून सफर एन्जॉय करतेय.

धमाल-मस्तीसोबतच सोनालीचं जबरदस्त फोटोसेशनसुध्दा सुरू आहे. उंटावर बसून सोनालीने चक्क टायटॅनिक पोझ दिली आहे. अथांग वाळवंट, डेझर्ट सफारी, बुर्ज कलिफा, या दुबईच्या प्रसिध्द ठिकाणांचा तिने मनोसोक्त आस्वाद घेतला. एकूणच ह्या फोटोंप्रमाणे मराठमोळ्या अप्सरेची ही दुबई सफर अविस्मरणीय झाली असणार हे मात्र नक्की!