‘चिमणी चिमणी’ला सोशल प्रेमींचा जास्त प्रतिसाद

 

नुकतचं 'लाल इश्क़- गुपित आहे साक्षीला'  या चित्रपटातलं चिमणी चिमणी हे गाणं सोशल मिडीयावर प्रदर्शित होऊन प्रचंड प्रमाणात व्हायरल झालं.  प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता सर्वांना जास्तच आवडलय असं वाटतय.

काहीसं वेगळं गाणं मराठी चित्रपटाला मिळालं आहे.  अमितराजने या गाण्याला संगीत दिलंय तर आदर्श शिंदेनी हे गाणं गायलं आहे. इतकेच नव्हे तर चित्रपटातील सर्वच कलाकार पियुष रानडे, स्नेहा चव्हाण, जयवंत वाडकर, आरती केळकर, कस्तुरी वावरे आणि खुद्द अमितराज यांनीही ते गायले आहे.  तसेच सचिन पाठकने या गाण्याचे बोल लिहिले आहेत.  'चिमणी चिमणी' हे रिफ्रेशिंग गाणं सर्वांना नक्कीच ठेका धरायला लावेल.

एकाच शॉटमध्ये या गाण्याचं चित्रिकरण करण्यात आलं आहे. कोणत्याही रिटेक शिवाय एका दमात परफॉर्म करण्यासाठी कलाकार व नृत्य दिग्दर्शकांनी अनेक दिवस तालीम आणि परिश्रम घेतले. असे हे सर्वच बाजूने परिपूर्ण असलेले नवीन धमाकेदार गाणं ऐकायला आणि पहायला प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. 
भन्साळी प्रॉडक्शन निर्मित, संजय लीला भन्साळी निर्मित, शबीना खान सहनिर्मित आणि स्वप्ना वाघमारे दिग्दर्शित 'लाल इश्क़- गुपित आहे साक्षीला' '२७ मे' रोजी प्रदर्शित होत आहे.