‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित मराठी चित्रपटाची निर्मिती करणार?

 

अवघ्या बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणारी सौंदर्यसम्राज्ञी ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षितच्या चाहत्यांपर्यंत सध्या एक बातमी वा-यासारखी पसरली आहे. अशी चर्चा होत आहे की माधुरी दीक्षित लवकरच एका मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहे.

मराठी चित्रपट आता यशाच्या शिखरावर पोहचला आहे आणि मराठी चित्रपट आणि त्यातील कलाकारांनी इतर इंडस्ट्रीचे स्वत:कडे वेधून घेतले आहे. म्हणूनच तर हिंदी इंडस्ट्रीतील कलाकार मराठी चित्रपटसृष्टीकडे वळले आहेत.

रितेश देशमुख, प्रियंका चोप्रा, अजय देवगण, जॉन अब्राहम, अक्षय कुमार या कलाकारानंतर माधुरी दीक्षितही लवकरच मराठी चित्रपटसृष्टीचा भाग बनणार आहे, अशी चर्चा जरी चालू असली तरी लवकरच प्रेक्षकांपर्यंत ऑफिशिअल बातमी लवकर पोहचवली जाईल.