रात्रीचा खेळ थांबणार?

 

झी मराठी वाहिनीवर नव्याने दाखल झालेली बहुचर्चित ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेवर संकंट ओढवण्याची शक्यता आहे. या मालिकेत कोणकणातील भूताखेतांचे चित्रण आपल्याला अनुभवायला मिळते. परंतु भास-आभासांच्या खेळासोबतच ही मालिका अंधश्रध्देला खतपाणी घालणारी असून त्याचा विपरीत परिणाम कोकणातील पर्यटनावर होऊ शकतो, म्हणूनच या मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शकांविरोधात चिपळून पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.  

कोकणातील नयनरम्य निसर्गाची पर्यटकांना नेहमीच भुरळ पाडते. परंतु या मालिकेत दाखविल्या जाणा-या वाड्यातील आणि कोकणातील परिसरांत व समुद्रकिना-यांवर घडणा-या घडामोडींमुळे भितीदायक वातावरण निर्माण होऊ शकते, असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे.