सिध्दार्थ पण बनणार का ‘वारस’?

 

महागुरु आणि मराठी सिनेसृष्टीचा बादशाह म्हणजेच अभिनेते सचिन पिळगांवकर आणि स्वप्नील जोशी यांचा लवकरच एक मराठी चित्रपट येणार आहे.  काही महिन्यांअगोदर सचिन पिळगांवकर आणि स्वप्नील जोशी यांनी त्यांच्या फॅन्सना ‘वारस’ या चित्रपटाचं एक मस्त सरप्राइज दिलं आहे.  ‘वारस’ या चित्रपटात सचिनजी आणि स्वप्नील हे दोघे एकत्र दिसणार आहेत.

आता आणखी एक सरप्राइज आम्ही तुम्हांला देणार आहे.  सध्या अशी चर्चा आहे की सचिनजी आणि स्वप्नील यांच्यासोबत सिध्दार्थ चांदेकर पण दिसणार आहे. ही चर्चा आणि हा अंदाज खरा असावा अशी नक्कीच अनेकांची इच्छा असेल.

जर खरंच सिध्दार्थ ‘वारस’ मध्ये काम करणार असेल तर प्रेक्षकांना ‘वारस’ हा चित्रपट आणि या चित्रपटातील स्वप्नील जोशी, सचिन पिळगांवकर, सिध्दार्थ चांदेकर यांच्या अभिनय मनोरंजनाची मेजवाणी ठरणार आहे.

राकेश सारंग दिग्दर्शित ‘वारस’ या चित्रपटाची निर्मिती वायकॉम 18 मोशन पिक्चर्स, 52 विक प्रा.लि., GSEAMS आणि माय प्रॉडक्शन्स करणार आहेत.