१५ मे ला ‘संस्कृती कला दर्पण’चा अविस्मरणीय सोहळा अनुभवा

 

सर्वात मानाचा मानला जाणारा पुरस्कार ‘संस्कृती कला दर्पण’ सोहळा दिमाखात पार पडला. या सोहळ्याचे अविस्मरणीय क्षण प्रेक्षकांना १५ मे रोजी अनुभवायला मिळणार आहे. 

अर्चना नेवरेकर फाऊंडेशन प्रस्तुत ‘संस्कृती कला दर्पण गौरव रजनी २०१६’ पुरस्कार सोहळ्याचे प्रक्षेपण रविवार, १५ मे रोजी संध्याकाळी ७ वाजता कलर्स मराठी वाहिनीवर होणार आहे.  मराठी नाटक, चित्रपट आणि टेलिव्हिजन क्षेत्रासाठी हा पुरस्कार महत्त्वाचा मानला जातो. हा अविस्मरणीय सोहळा नक्की पाहा.