सिध्दार्थच्या लेकीचं नाटकासाठी पहिलं डबिंग

 

प्रसाद कांबळी प्रस्तुत भद्रकाली प्रॉडक्शनची ५३ वी नाट्यकृती आणि केदार शिंदे लिखित-दिग्दर्शित ‘गेला उडत’ या नाटकाची चर्चा तर सर्व रसिक प्रेक्षकांमध्ये तर होतच आहे. पण आता आणखी एक विषय प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनणार आहे. तो विषय नक्कीच आकर्षक आणि उत्सुकतेचा आहे हे सर्वांना पटेल. आपण बोलतोय सिध्दार्थ जाधव आणि त्याच्या फॅमिलीविषयी.  आता सिध्दार्थच्या नाटकाचा आणि फॅमिलीचा या नाटकाशी काय संबंध असा प्रश्न पडला असेल ना.

सिध्दार्थ जाधवची प्रमुख भूमिका असलेल्या ‘गेला उडत’ या नाटकात त्याची बायको तृप्ती आणि मुलगी स्वरा पण असणार आहे. लाडक्या मुलीच्या भूमिकेत स्वरा आणि तिच्या आईच्या भूमिकेत तृप्ती आहे.  नुकतच या नाटकाचं डबिंग झालं. स्वराने पहिल्यांदाच नाटकासाठी डबिंग केलं.  बाबा सिध्दार्थने लाडक्या लेकीची डबिंगसाठी चांगली तयारी करुन घेतली.

आता चर्चा तर होणारच आणि झालीच पाहिजे कारण आपल्या सिध्दूचं नाटक आहे राव.