बोल्ड आणि ब्युटिफूल सईची आंतरराष्ट्रीय भरारी

 

मराठी सिनेसृष्टीतील टॉपची बोल्ड आणि ब्युटीफूल अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. ‘हंटर’सिनेमाद्वारे बोल्ड सईने बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण केलं. आता मराठमोळ्या सई मॅडम चक्क आंतरराष्ट्रीय भरारी घेण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. काय म्हणताय काय,.... पण हो, बातमी अगदी खरी आहे!  बॉलिवूडच्या काही दिग्गज कलाकारांसोबत सई ‘लव्ह सोनिया’ ह्या आंतरराष्ट्रीय सिनेमात झळकणार असल्याचं समजतंय.

‘स्लमडॉग मिल्यिनिअर’फेम अभिनेत्री फ्रिडा पिंटो, अनुपम खेर, पॉल डॅनो, मनोज वाजपयी, अदिल हुसैन, राजकुमार राव आणि रिचा चढ्ढा आदी कलाकारांसोबत सई ताम्हणकर ‘लव्ह सोनिया’ या हॉलिवूडपटात एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे.‘स्लमडॉग मिल्यिनिअर’ सिनेमाचे निर्माते तब्रेज नुरानी हे या सिनेमाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. लवकरच या सिनेमाच्या शूटींगला सुरूवात होणार असल्याचं कळतंय.

‘लव्ह सोनिया’ या हॉलिवूडपटाद्वारे तिच्या अभिनय कारकिर्दीने नक्कीच मोठी झेप घेतलीय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मराठी धमाल डॉट कॉमतर्फे अभिनेत्री सई ताम्हणकरला ह्या आंतरराष्ट्रीय भरारीसाठी खुप खुप शुभेच्छा!