‘का रे दुरावा’च्या फॅन्ससाठी गुड न्यूज

 

‘का रे दुरावा’ या प्रेक्षकांच्या लाडक्या मालिकेपासून आता कायमचाच दुरावा येणार आहे. म्हणजेच ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेतेय. या मालिकेमुळे जय-अदिती ही जोडी घराघरांत लोकप्रिय झाली. मालिका संपतेय म्हणून आता चाहत्यांना नाराज होण्याचं बिलकूल कारण नाही. जय आणि अदिती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तुम्ही म्हणाल, आता ह्यांची कुठली नवी मालिका येतेय, की या मालिकेचा नवा सीझन येतोय... पण असं काहीच नाही तर जयची भूमिका साकारणारा अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री सुरूची अडारकर हे दोघंही एका नव्या नाटकात एकत्र झळकत आहेत. ही एक फ्रेश लव्हस्टोरी असून ‘स्ट्रॉबेरी’ असं या नाटकाचं नाव आहे.

सुयश-सुरूची या जोडीची नवी केमिस्ट्री पुन्हा कशी जुळतेय ह्याची सर्वांनाच उत्सुकता आहे.