‘गोष्ट तशी गमतीची’ नाटकाचा ३००वा प्रयोग

 

सोनल प्रॉडक्शन्स आणि नाट्यसुमन निर्मित ‘गोष्ट तशी गमतीची’ या नाटकाचा ३०० वा प्रयोग १५ मे रोजी पुणे येथील बालगंधर्व नाट्यगृहात दुपारी १२:३० होणार आहे.  अद्वैत दादरकर दिग्दर्शित आणि मिहिर राजदा लिखित या नाटकाला अनेक रसिक प्रेक्षकांनी दाद दिली, या नाटकावर जिवापाड प्रेम केले म्हणूनच १५ मे ला याचा ३०० वा प्रयोग होत आहे. यापुढेही याचा प्रयोग चालू राहेल याची खात्री वाटते. 

‘गोष्ट तशी गमतीची’ मध्ये शशांक केतकर, लीना भागवत आणि मंगेश कदम यांनी उत्तम अभिनय केला आहे.