ओळखा…प्रार्थनाचा हिरो कोण ?

 

अभिनेत्री प्रार्थना बेहरे कोणासोबत दिसते, कोणाच्या आड लपलीय, हा कोण आहे, .असे असंख्य प्रश्न हे पोस्टर पाहून पडत आहेत. अजून तरी या हिरोचाचेहरा दिसत नसला तरी प्रार्थनाच्या आगामी सिनेमाचा हा फर्स्ट लूक आहे. पण सिनेमाच्या नावासोबतच या डॅशिंग हिरोचं नावसुध्दा गुलदस्त्यातच ठेवण्यात आलंय. लवकरच सिनेमाचा नायक आणि सिनेमाचं नाव उघड होण्याची सर्वत्र उत्सुकता आहे.