हेमांगी कवी ‘बॅक टू स्कूल’

 

आपल्या धमाल विनोदांनी आणि अचूक टाईमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री हेमांगी कवी पुन्हा शाळेत जाणार आहे. शाळेत आणि आता, असं का म्हणताय. समजलं नाही. अहो, ती काही खरीखुरी शाळेत जात नाहीय किंवा शिक्षिका म्हणूनसुद्दा जात नाहीय, तर स्कूल चलेगा’ हा तिचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

याबाबत खुद्द हेमांगीनेच सोशल साईट्वर ही माहिती दिली. त्यामुळे हेमांगीच्या फॅन्ससाठी ही आनंदाची बातमी असून सर्वत्र या सिनेमाची उत्सुकता आहे.