अमेयचं करिअर गेलं चुलीत?

 

एका विशिष्ट वेळी एखादी व्यक्ती त्याच्या अस्तित्वाचा शोध घेत असते. आपला जगाशी काय नि कसा संबंध आहे आणि अखेरीस आपलं आयुष्य किती निरर्थक आहे अशा निष्कर्षाकडे येऊन पोहचते.

सॉरी, आम्ही जरा विचित्र परिचय करुन दिला असं वाटत असेल ना. पण या जगात आहेत अशी काही लोकं ज्यांच्याकडे बघून वाटतं की हे खरोखर या जगाचे नाही. या लोकांना आराम करण्यासाठी आणि स्वतःचा वाटचालीचा पुर्नविचार करण्साठी वेळ हवा असतो.

अशावेळी ही लोकं काय करत असतील? सोपं आहे याचं उत्तर. अशावेळी ते हिमालय प्रदेशात जातील. जसा आपला कूल बॉय कैवू उर्फ अमेय वाघ गेला आहे.

शहरातल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून अमेयने वेळ काढून तो हिमालयमध्ये रिलॅक्स होत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. अमेयचं वैशिष्ट्य म्हणजे एखाद्या परिस्थितीवर तो भारी स्टेटस अपडेट करतो आणि आताचं त्याचे स्टेटस “Career गेलं चुलीत... आयुष्य पाहिजे valleyत !!” हे आहे.

अमेय लवकरच येईल अशी आशा त्याच्या फॅन्सनी ठेवली आहे. नाहीतर करिअर गेलं चुलीत असं तो बोलल्यामुळे आम्ही टॅलेंटेड कलाकाराला गमावू असं फॅन्सना वाटेल.