ती लग्न करतेय?

 

दररोज आम्ही सोशल मिडीयावर तुमच्या आवडत्या सेलिब्रिटींचे अपडेट्स चेक करत असतो जेणेकरुन त्यांच्या चाहत्यांना एक सुंदर फोटो किंवा सरप्रायझिंग बातमी दिली जाईल. आणि आज मनवा नाईकचे चाहते खूष होतील असे काही स्पेशल फोटोस् आम्ही पाहिले आहेत. ते स्पेशल फोटोस् पाहून असं वाटतंय की मनवा नाईक लग्न करतेय? 

नुकतेच सोशल मिडीयावर मनवा नाईकचे काही फोटोस् शेअर करण्यात आले आहे आणि त्या फोटोंमध्ये मनवा नाईकच्या हातावर सुंदर मेंहदी काढण्यात आली आहे आणि मनवाने सुंदर, गोंडस असा ड्रेस परिधान केला आहे. इतकेच नव्हे तर मनवाच्या काही फोटोस् वर ‘अभिनंदन’ असे मेसेजेस पण येत आहेत.

आता नेमकं खरं काय हे मनवा नाईकच सांगू शकते. खरं काय आहे हे कळायला जास्त वेळ लागेल असं वाटत नाही. तोपर्यंत मनवाचे हे सुंदर फोटोस् पाहा-