खरंच प्राजक्ता आणि ललितमध्ये पुन्हा काहीतरी शिजतंय?

 

कदाचित प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकर ही जोडी प्रकाश कुंटे यांच्या आगामी चित्रपटात दिसणार आहेत...

काही ऑन स्क्रिन जोड्या आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकतात आणि मग या आवडत्या जोड्यांना पुन्हा पुन्हा पाहावं असं त्यांना वाटतं, मग ते नाटक, मालिका, सिनेमे यापैंकी कोणतंही माध्यम असो. झी मराठी वाहिनीवरील जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेली प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकर ही जोडी प्रेक्षकांना खूप भावली. आणि प्राजक्ता माळीने नुकत्याच केलेल्या पोस्टमुळे असं वाटतंय की प्राजक्ता आणि ललित ही जोडी पुन्हा एकत्र येणार आणि ते देखील प्रकाश कुंटे दिग्दर्शित मराठी चित्रपटाच्या माध्यमातून. प्रकाश कुंटे यांनी कॉफी आणि बंरच काही, &  जरा हटके या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

झी मराठीवरील आदित्य- मेघनाच्या प्रेमाने ओसंडून वाहणारी व जोडीला देसाई वाडी आणि खुमासदार परिवाराची ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेने प्रेक्षकांचे खरोखर मन जिंकले. महाराष्ट्राच्या घराघरांत आदित्य-मेघनाच्या प्रेमाचे गोडवे देखील गायला सुरूवात झाली होती.

आता एका नव्या माध्यमातून आदित्य-मेघना उर्फ प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकर ही जोडी पुन्हा पाहायला मिळणार ही बातमी जर खरी असली तर प्रेक्षकांचा आनंद गगनात मावेनासा होईल...