सनी लिओनी मराठीत 'जलवा' दाखवणार का?

 

सनी लिओनी मराठीत......वाचून धक्का बसला ना ! पण सध्या तिच्या नावाची चर्चा मराठी सिनेसृष्टीत चालू आहे.

मराठी चित्रपटात यापूर्वी कधीच न झालेला असा थरार ‘राजन’ या चित्रपटामार्फत सिनेरसिकांना अनुभवयाला मिळणार आहे. खास करुन छोटा राजन याच्या हयातीत त्याच्यावर आधारित चित्रपटात कोणती मराठी अभिनेता ही भूमिका साकारण्याचं धाडस करणार आहे, हे सध्या गुपितच आहे. 

परंतु अजून एक रहस्य म्हणजे गेल्या कित्येक दिवसापासून सनी लिओनी मराठी सिनेमात झळकणार आहे अशी सर्वत्र चर्चा सगळीकडे आहे.  ‘राजन’ या सिनेमात सनी लिओनी आयटम सॉंग करणार अशी बातमी सध्या चर्चेचा विषय बनत आहे.

 “आयुष्यात काहीतरी मोठे करण्याची धडपड प्रत्येक माणूस करत असतो, समाजात आपली विशेष ओळख बनविण्यासाठी निर्धारित लक्ष्य गाठण्याचा अट्टाहास तो करतो, मात्र त्याची ही जिद्द कधी कधी त्याला चुकीच्या मार्गावर घेऊन जाते, आणि त्यातूनच त्याच्या आयुष्यात होत असलेले बदल मी कागदावर उतरवले”, असे या चित्रपटाचे लेखक- दिग्दर्शक भरत सुनंदा म्हणाले.

अंडडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या आयुष्यावरील 'राजन' हा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे.