जान्हवीच्या प्रेग्नन्सीची सोशल साईटसवर उडवली खिल्ली

 

“काहीही हं श्री...” च्या तुफान यशानंतर आता ‘होणार सून मी’ ह्या घरची मालिकेला नेटकरांनी पुन्हा धारेवर धरलंय. मालिकेला भरघोस यश मिळालं की मग त्यातील व्यक्तिरेखांशी निगडीत गोष्टींना ताणून ठेवण्यात आणि टीआरपी वाढवण्यात लेखक-दिग्दर्शक धन्यता मानतात.

बरेच महिने उलटून गेले तरी जान्हवीची डिलीव्हरी होत नसल्याने जसे प्रेक्षक धास्तावले आहेत तसेच सोशल नेटवर्किंग साईटवरचे ग्रुपसुध्दा चिंताग्रस्त झाले आहेत. सध्या या ग्रुप्सवर सर्वात ट्रेण्डिंग जोक्स हे जान्हवीच्या प्रेग्नन्सीचे आहे. सर्वत्र जान्हवीच्या प्रेग्नन्सीची खिल्ली उडवली जात आहे. असेच काही काही खास जोक्स www.marathidhamaal.com  मराठी धमाल डॉट कॉमवर.

...............

जान्हवीची डिलीव्हरी दोन आठवड्यात करू - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेला आश्वासन

तर जान्हवीला जेव्हा वाटेल तेव्हा तिची प्रसुती होऊ दे..तिच्यावर दबाव नको - पंकजा मुंडेंचा घरचा आहेर

दोन आठवड्यात डिलीव्हरी नाही झाली तर आम्ही स्वतः सीझर करू - उद्धव ठाकरे

जान्हवीची डिलीव्हरी आतापर्यंत व्हायला पाहिजे होती. युती सरकार जान्हवीच्या डिलीव्हरीचं श्रेय स्वतः घेण्याचा प्रयत्न करत आहे. पण मी ते होऊ देणार नाही - शरद पवार

जान्हवीची डिलीव्हरी न होण्यामागे उध्दव ठाकरे व शिवसेनेचा हात आहे - नाराज राणे

नरेंद्र मोदींच्या दबावामुळेच जान्हवीची डिलीव्हरी रोखली जातेय - ओवेशी

माझ्या हातात एक हाती सत्ता द्या, मी जान्हवीची डिलीव्हरी करुन दाखवतो - राज ठाकरे

नाही झाली जान्हवीची डिलीव्हरी

तर मी करील सरकारची रिकव्हरी...

  • आपले कवी डॉ. रामदास आठवले

...........................

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारला धमकी दिली आहे की, “येत्या ४ दिवसांत जानव्हीची डिलाव्हरी झाली नाही तर संसदेचे पावसावळी अधिवेशन बंद पाडू”.

.............................

होणार सून मी या घरची

या सीरिअलचे नाव बदलून

'गरोदर आहे मी या वर्षी' 

असे होणार आहे....