‘लालबागची राणी’ मध्ये पार्थचा निरागस अभिनय

 

लालबागची राणी या चित्रपटात वीणा जामकरसोबत जो बालकलाकार आहे पार्थ भालेराव या बच्चाचं नाव ऐकायल्या सारखं वाटतं ना? त्याला पाहिल्यावर कुठेतरी त्याला पाहिल्यासारखं पण वाटतं ना? अहो... हा तोच बिनधास्त कलाकार ज्याने बिग बी अमिताभजी बच्चनसोबत भुतनाथ रिटर्न्स् या हिंदी चित्रपटात बिनधास्त काम केलं. भुतनाथ रिटर्न्स् नंतर किल्ला या मराठी चित्रपटातही त्याने काम केलं आहे.

पार्थ आता लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित लालबागची राणी या चित्रपटातून परत एकदा प्रेक्षकांसमोर येणार आहे आणि परत प्रेक्षक त्याच्यावर आणि त्याच्या निरागस अभिनयावर भरपूर प्रेम करतील.