जाणून घ्या,‘अनुराग’च्या नायकाला कायदेशीर नोटीस का बजावली?

 

पती पत्नीच्या नात्यावर आधारीत ‘अनुराग’ या बहुचर्चित आगामी सिनेमाचा नायक धर्मेंद्र गोहेल याला सिनेमाचे निर्माते डॉक्टर अंबरीश दरक ह्यांनी कराराचा भंग केल्याबद्दल कायदेशीर नोटिस बजावली आहे.

डॉक्टर अंबरीश दरक लिखित, दिग्दर्शित आणि निर्मित ‘अनुराग’ ह्या दोनच पात्र असलेल्या सिनेमाचे नायक धर्मेंद्र गोहेल हे सिनेमाच्या चित्रिकरणानंतर कोणत्याही प्रसिद्धी कार्यक्रमांना (promotional activities ला) उपस्थित राहिले नसल्यामुळे त्यांनी निर्मात्याबरोबर केलेल्या कराराचा भंग केला असून नुकसान भरपाईचा दावा दाखल करणारी नोटिस वकिलांमार्फत पाठविण्यात आली आहे.

येत्या ११ मार्च २०१६ला प्रदर्शित होणाऱ्या ‘अनुराग’च्या प्रसिद्धी कार्यक्रमांना सिनेमाची नायिका मृण्मयी देशपांडे एकटीच उपस्थित राहायची आणि अभिनेता धर्मेंद्र गोहेलला वेळोवेळी कळवून सुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले नसल्याचं डॉ. अंबरीश दरक ह्यांच म्हणणं आहे.  निर्मात्यांना म्हणूनच सिनेमाच्या प्रसिद्धी कार्यक्रमांना (promotional activities ) अनेक ठिकाणी कमतरता जाणवली. ह्या प्रकरणातून निर्मात्याला झालेला मनस्ताप आणि आर्थिक नुकसान पाहता निर्मात्याने हे कायदेशीर पाऊल उचलले असल्याचं सांगण्यात आलं आहे.