सलमानची गर्लफ्रेण्ड इयुलिआसोबत थिरकले महेश मांजरेकर?

 

सध्या सर्वत्र एकाच गोष्टीची चर्चा होत आहे ती म्हणजे अभिनेता सलमान खानची गर्लफ्रेण्ड इयुलिआ वंतूर आणि महेश मांजरेकर यांचा डान्स परफॉर्मन्स.

नुकतेच, महेश मांजरेकरांच्या ‘रुबिक्स क्यूब’ या चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा दिमाखात फार पडला आणि या संगीत प्रकाशन सोहळ्यात अभिनेता सलमान खान आणि त्याची गर्लफ्रेण्ड इयुलिआ वंतूर यांची विशेष उपस्थिती होती. त्यावेळी सोहळ्यात सर्वांचं लक्ष जरी सलमान खान आणि इयुलिआवर असलं तरी देखील सेंटर ऑफ ऍट्रक्शन ठरले महेश मांजरेकर आणि इयुलिआ वंतूर यांचा एकत्र डान्स परफॉर्मन्स.

‘रुबिक्स क्यूब’ चित्रपटात गायलेलं गाणं इयुलिआ वंतूरने संगीत प्रकाशन सोहळ्यात पुन्हा एकदा गायले. त्यानंतर ‘दिल है लफंगा’ या गाण्यावर इयुलिआ आणि महेश मांजरेकरांनी डान्स केला.

इयुलिआने प्रथमच मराठी चित्रपटासाठी काम केले आहे आणि पहिल्यांदाच मराठी चित्रपटाच्या सोहळ्यात उपस्थित राहिली आहे. इतर कलाकारांना मराठी सिनेसृष्टीत पदार्पणाची संधी देऊन मराठी इंडस्ट्रीकडे एक सुवर्णसंधी म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन देण्याचे संपूर्ण श्रेय महेश मांजरेकर यांना जाते. मांजरेकरांनी इयुलिआ वंतूरची ओळख मराठी इंडस्ट्रीला ‘रुबिक्स क्यूब’ चित्रपटातून करुन दिली आहे.