मानसीला करायचंय रणवीर सिंहसोबत लग्न

 

बोल्ड आणि ब्युटिफूल अभिनेत्री मानसी नाईक नेहमीच तिच्या नृत्यशैली आणि अभिनयामुळे चर्चेत राहते. बघतोय रिक्षावाला, बाई वाड्यावर या या गाण्यांवर नृत्य करुन तिने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे असं म्हणायला हरकत नाही.  पण आता मानसी नाईक तिच्या चाहत्यावर्गामध्ये एका वेगळ्याच कारणाने चर्चेत येणार आहे असं वाटतंय. याचे कारण देखील मानसी नाईकचे एक वक्तव्य असणार आहे.

एकता-एक पॉवर, कॅपेचिनो, कुटुंब, तीन बायका फजिती ऐका, तुक्या तुकविला नाग्या नाचविला, जबरदस्त, मर्डर मेस्त्री, दि शॅडो, ढोलकी, कॅरी ऑन देशपांडे आदी चित्रपटांतून मानसीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे आणि खास करुन तिच्या नृत्यशैलीला प्रेक्षकांसह कलाकारांनी पण मनापासून दाद दिली आहे. 

प्रत्येकाला आपल्या प्रेमात पाडणारी मानसी तिच्या चाहत्यांसाठी तिची मनातील इच्छा सांगत आहे. तिची ही इच्छा जाणून घेतल्यावर तुम्हांला पण वाटेल की खरंच मासीची ही इच्छा पूर्ण व्हावी. 

मराठी सिनेनाट्यसृष्टीमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत आणि असं असताना आता कोणत्या कलाकाराचं लग्न आहे किंवा आपल्या आवडत्या कलाकारांच्या लग्नाविषयी जाणून घेण्यासाठी अनेकांना आवडत असेल. म्हणूनच मानसी नाईकला तिच्या लग्नाविषयी विचारण्यात आल्यावर ती म्हणाली, जर रणवीर सिंह लग्न करण्यासाठी तयार असेल तर मी लग्न करण्यासाठी तयार आहे. इश्काची बेबी डॉल मानसी नाईक ही बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह याची खूप मोठी फॅन आहे आणि रणवीरचा अभिनय आणि खास करुन त्याची नृत्यशैली मानसली सतत त्याच्या प्रेमात पाडते. आणि मानसीच्या म्हणण्याप्रमाणे जर रणवीर सिंह तयार असेल तर मला त्याच्याशी लग्न करण्यात काहीच हरकत नसणार.

एक फॅन म्हणून ही आहे आपल्या आवडत्या कलाकाराविषयी असलेली खरी आणि सुंदर भावना.