राधिकाचा आनंद गगनात मावेना

 

बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री राधिका आपटे दिसेंदिवस यशाच्या पाय-या चढत आहे. राधिकाच्या अभिनयाची चुणूक तर सर्वज्ञात आहे. आता तर म्हणे मराठमोळ्या राधिकाबाई चक्क सुपरस्टार रजनीकांतसोबत सिनेमात झळकणार आहेत. त्यामुळे राधिकाचा आनंद गगनात मावत नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिग्दर्शक रणजीत या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. सुरूवातीला नायिकेविना हा सिनेमा तयार होणार होता, पण नंतर अभिनेत्री विद्या बालनला या सिनेमासाठी विचारात घेतले जात होते आणि आता चक्क ‘लय भारी’ राधिका आपटे या सिनेमात रंजनीकांतसोबत भूमिका साकारणार आहे.

‘लय भारी’, ‘बदलापूर’, ‘हंटर’ या सिनेमांमधून राधिकाचे अभिनय कौशल्य पण पाहिलंच आहे. नुकत्याच आलेल्या बंगाली शॉर्ट फिल्म ‘अहल्या’मधील तिच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच आगामी ‘मांझी- द माऊंटन मॅन’ सिनेमातही राधिका लक्षवेधी भूमिकेत दिसेल.