‘सचिन अ बिलीअन ड्रीम्स’मध्ये झळकणार मराठमोळा मयुरेश पेम

 

भारतीय क्रिकेटचं बलस्थान म्हणजेच मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या जीवनावर आधारीत ‘सचिन अ बिलीअन ड्रीम्स’ हा सिनेमा येतोय, हे सर्वज्ञात आहे. ह्या भव्य सिनेमात एक मराठमोळा चेहरा झळकतोय तो म्हणजे, अभिनेता मयुरेश पेम. सचिनच्या मोठया भावाची म्हणजेच नितीन तेंडूलकरची महत्त्वपूर्ण भूमिका मयुरेश साकारणार आहे. हॉलिवुडचे दिग्दर्शक जेम्स एरस्कीन यांनी ह्यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केलं आहे.

सुपरहीट नाटक ‘ऑल दि बेस्ट’मुळे मयुरेश पेम प्रसिध्दीझोतात आला. अभिनयासोबतच एक उत्तम डान्सर म्हणूनही त्याचं नाव आग्राहानं घेतलं जातं. आता ‘सचिन अ बिलीअन ड्रीम्स’मुळे मयुरेशच्या कारकिर्दीला गगनभरारी मिळणार आहे.

मराठी धमाल डॉट कॉमतर्फेम अभिनेता मयुरेश पेमला पुढील यशस्वी वाटचालीकरता हार्दिक शुभेच्छा!