भेटा ‘मि. अॅण्ड मिसेस सदाचारी’ यांना

 

अभिनेत्री प्रार्थना बेहरे कोणासोबत दिसते, कोणाच्या आड लपलीय, हा कोण आहे, .असे असंख्य प्रश्न हे पोस्टर पाहून पडले. अजून तरी या हिरोचा चेहरा दिसत नसला तरी प्रार्थनाच्या आगामी सिनेमाचा हा फर्स्ट लूक आहे. इंडियन फिल्म् स्टुडिओचे सर्वैसर्वा आणि निर्माते आशिष वाघ या सिनेमाची निर्मिती करत असून ‘मी अॅण्ड मिसेस सदाचारी’ असं या नव्या सिनेमाचं नाव असल्याची चर्चा सुरू आहे.

निर्माते आशिष वाघ यांनी ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’ आणि आगामी ‘तु ही रे’ व ‘सर्व मंगल सावधान’ सिनेमाची निर्मिती करत आहेत. येत्या  4 सप्टेंबरला शिव आणि गार्गीची जोडी या नव्या सिनेमाच्या टिझरद्वारे आपल्यासमोर उघड होईल. या नव्या सिनेमाची सर्वत्र उत्सुकता आहे.