इरफान खान आणि डलक्यूअर सलमान यांच्यासोबत झळकणार मिथिला पालकर

 

मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीतील अभिनेत्री मिथिला पालकर ही सर्वांच्याच परिचयाची आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपण सर्वांनी तिचे काम पाहिले आहे. गर्ल इन दि सिटी, लिटिल थिंग्स यांसारख्या युथ ओरिएंण्टेड प्रोजेक्टमधून तिने सर्वांचे मनोरंजन केले आहे. तसेच मिथिलाचा ‘मुरांबा’ हा चित्रपटही विशेष लोकप्रिय ठरला. आता मिथिलाच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर अशी आहे की लवकरच मिथिला एका मोठ्या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. या अगोदरही तिने हिंदी चित्रपटात भूमिका साकारली आहे. मात्र या तिच्या आगामी चित्रपटात ती विशेष आणि महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. तसेच या आगामी हिंदी चित्रपटात मिथिला अभिनेते इरफान खान आणि मल्याळम अभिनेता डलक्यूअर सलमान यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

अद्याप या चित्रपटाचे शिर्षक अजून प्रदर्शित केले नसले तरी देखील असं म्हंटलं जातंय की मिथिलाचा हा चित्रपट निखळ मनोरंजन असेल. आकर्ष खुराना या चित्रपटाचे दिग्दर्शन करतील तर हुसैन दलाल यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. रॉनी स्क्रुवाला हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.


मिथिला पालकर, अभिनेते इरफान खान आणि मल्याळम अभिनेता डलक्यूअर सलमान यांची ऑन-स्क्रिन केमिस्ट्री पाहायला सर्वजण नक्कीच आतुर असतील.