मुक्ताचा ‘कोड मंत्र’ लवकरच रंगभूमीवर

 

९ मे रोजी, अक्षय तृतीयाच्या शुभ दिवशी अभिनेत्री मुक्ता बर्वेच्या नवीन नाटकाचा मुहुर्त विले पार्ले (मुंबई) येथे पार पडला.  आणखी एक नवीन नाटक हे प्रेषकांसाठी खास मनोरंजनच आहे. कारण या काही महिन्यांत नवीन नाटके आली आणि त्याला प्रेषकांचा सकारात्मक प्रतिसाद देखील मिळाला. 

अनामिका रसिका निर्मित आणि साईसाक्षी प्रकाशित ‘कोड मंत्र’ नाटकाचं दिग्दर्शन राजेश जोशी यांनी केले आहे. या नाटकाची निर्मिती मुक्ता बर्वेच करत असून यामध्ये मुक्ता बर्वेसोबत उमेश जगताप, अजय पुरकर आणि फैज खान या कलाकारांचा अभिनय आहे. तसेच ४० कलाकारांची तगडी फौज यामध्ये असणार आहे. मूळ नाटक  स्नेहा देसाई यांनी लिहिले आहे व त्याचे मराठीत रुपांतर विजय निकम यांनी केले आहे. लवकरच ‘कोड मंत्र’ प्रेषकांच्या भेटीला रंगमंचावर सज्ज होणार आहे.