अजय देवगणच्या मराठी चित्रपटांत नानांची प्रमुख भूमिका

 

सध्या सर्वच कलाकार मराठी सिनेमाकडे वळू लागले आहेत. रितेश देशमुख, विद्या बालन, सलमान खान, जॅकी श्रॉफ, प्रियांका चोप्रा, अजय देवगण या कलाकारांनीसुध्दा मराठीत पदार्पण केलं आहे. पण बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणला पुन्हा एकदा मराठी सिनेमा खुणावू लागला आहे.

‘विटी दांडू’ या चित्रपटानंतर अजय देवगण पुन्हा एकदा मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहे. अजय देवगण सोबत, अभिनव शुक्ला आणि नाना पाटेकर पण मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहेत आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे करणार आहेत.

या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे निर्मितीसह नाना पाटेकर या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका पण साकारणार आहेत. या चित्रपटाचा जॉनर थ्रिलर आहे असं सांगितलं जातंय, त्यामुळे प्रेक्षकांच्या सर्वच आवडीच्या गोष्टी एकत्र जुळून आल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही. जसे की, अजय देवगण यांची मराठी चित्रपट निर्मिती, नाना पाटेकरांची प्रमुख भूमिका आणि सतीश राजवाडे दिग्दर्शित थरारपट.