‘नटसम्राट’ जोडी पुन्हा एकदा एकत्र

 

एखाद्या चित्रपटातील जोडी गाजली की पुन्हा त्या जोडीने एकत्र यावं, प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी अजून एक दमदार चित्रपट बनवावा असं प्रत्येकाला वाटत असतं. आणि जोडी म्हंटली की फक्त अभिनेता-अभिनेत्रीचीच जोडी नसते तर अभिनेता-दिग्दर्शक यांची पण जोडी असू शकते. दिग्दर्शक आणि अभिनेता हे नाव उच्चारलं की सर्वप्रथम नाव येतं ते नटसम्राट जोडीचं म्हणजेच ‘अभिनेता नाना पाटेकर आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर’ यांचं.

२०१६ च्या सुरुवातीलाच या जोडीने ‘नटसम्राट’ चित्रपटाच्या मार्फत प्रेक्षकांना एक अविस्मरणीय भेट दिली. आता या जोडीने पुन्हा यावं अशी अनेकांची इच्छा आहे आणि मायबाप रसिक प्रेक्षकांच्या इच्छेमुळे ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येणार अशी चर्चा सध्या होत आहे.

नाना पाटेकर आणि महेश मांजरेकरांच्या आगामी चित्रपटाचे नाव नेशन फर्स्ट असं आहे. चित्रपटाचे नाव कुतुहल वाढवणारं आहे आणि या चित्रपटाच्या कथेविषयी लवकरच प्रेक्षकांना कळेल.