OMG! शिवानी–शिवराज काय करत आहेत?

 

मराठी चित्रपट, नाटक, मालिका ज्याप्रमाणे आता प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनत आहे. त्याप्रमाणेच वेब सिरीझ हा मराठीतला नवीन प्रकार पण प्रेक्षकांच्या आवडीचा बनत चालला आहे. बॉलिवूडनंतर आता मराठी सिनेसृष्टीतपण वेब सिरीझ चा क्रेझ वाढत आहे. सलग एका पाठोपाठ एक वेब सिरीझ येत आहेत.

‘योलो’ म्हणून अजून एका वेब सिरीझचा व्हिडियो नुकताच सोशल मिडियावर प्रदर्शित झाला आहे. ‘योलो’ ही कथा ४ वेगवेगळ्या कुटुंबातील मित्रमैत्रिणीची (चोको, परी, सारिका आणि रोचक) यांची आहे. वेगवेगळ्या संस्कृती, परंपरेने वाढलेली ही चौघं पण त्यांचा आयुष्यातील पाहण्याचा दृष्टीकोन, त्यांची स्वप्न मात्र सारखीच आहे.

सोनी लिव्ह वरील ही पहिली मराठी वेब सिरीझ येत्या ११ जानेवारीपासून चालू होत असून दर बुधवारी प्रेक्षकांना ही वेब मालिका पाहायला मिळणार आहे. यामध्ये शिवानी रंगोळे, शिवराज वायचळ, सई ताम्हणकर, ऋतुराज शिंदे, आनंद इंगळे, आणि इतर बरेच कलाकार आहेत. सध्या मराठीतील बरेचसे कलाकार आता वेब सिरीझला जास्त प्राधान्य देत आहे हे दिसून येते.  

पाहा ‘योलो’ चा पहिला प्रोमो-