OMG! ‘चला हवा येऊ द्या...’मध्ये कोणी लावली हजेरी?

 

काय?... ‘चला हवा येऊ द्या..’च्या मंचावर बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान. झालात ना आश्चर्यचकित. आम्ही सांगतो. आपल्या सर्वांचे लाडके कॉमेडीचे भाऊबली म्हणजेच भाऊ कदम यांनी सल्लू भाईजान यांची भेट घेतली. या भेटीचा फोटो नुकताच सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. म्हणून की, काय आता दस्तुरखुद्द सलमान खान ‘चला हवा येऊ द्या..’ या तुफान लोकप्रिय कार्यक्रमात आपल्या आगामी ‘सुलतान’ सिनेमाच्या प्रोमोशनसाठी हजेरी लावणार असल्याची जोरदार चर्चा रंगलीय.

सलमान खानचं मराठी प्रेम सर्वज्ञात आहे. मराठमोळा बॉलिवूडकर रितेश देशमुखच्या ‘लय भारी’ सिनेमात सल्लूने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. ‘चला हवा येऊ द्या..’ हा कार्यक्रम घराघरांत लोकप्रिय आहे. प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारा हा कार्यक्रम नाटक आणि सिनेमांच्यां प्रोमोशनचं एक हक्काचं व्यासपीठ आहे. आता या मंचावर, सलमान खानने हजेरी लावली तर धमाल उडेल हे नक्की!