OMG! सुबोध भावे मनोरूग्ण?

 

सिनेसृष्टीतील गुणी अभिनेता सुबोध भावे मनोरूग्ण झाला,म्हणजे काय?...आतापर्यंत तर चांगला होता. अहो, पण घाबरायचं काहीचं कारण नाही. सुबोध भावे मनोरूग्णवगैरे झालेला नाही तर एका आगामी सिनेमात तो मनोरूग्णाची भूमिका साकारतोय. ‘खेळ’असं, त्याच्या आगामी सिनेमाचं नाव आहे. मराठी सिनेसृष्टीतील एक चतुरस्त्र अभिनेता अशी सुबोध भावेची ओळख आहे. बालगंधर्व आणि कट्यार काळजात घुसली यांसारख्या दर्जेदार सिनेमातून त्याने आपल्या अभिनय आणि दिग्दर्शन कौशल्याची छाप पाडली.

सामाजिक सिनेमांना मी सध्या कंटाळलो,असून सध्या काहीतरी आव्हानात्मक करण्याकडे माझा कल आहे, असं सुबोधचं म्हणणं आहे. ‘किरण कुलकर्णी V/Sकिरण कुलकर्णी’ सिनेमातसुध्दा मी विनोदी भूमिका साकरलीय. म्हणूनच मी मनोरूग्णाची वेगळ्या पठडीतील भूमिका मी ‘खेळ’मध्ये साकारतोय. ही एक दुहेरी व्यक्तिमत्त्व असलेली व्यक्तिरेखा आहे. माझ्या पूर्वीच्या गंभीर भूमिकांमधून ही भूमिका मला नक्कीच एक रिफ्रेशींग ब्रेक देईल.

आता अभिनेता सुबोध भावेला मनोरूग्णाच्या नव्या भूमिकेत पाहायला सारेच उत्सुक आहेत.