प्रेक्षकांना दिलखुलासपणे हसवणा-या या कलाकाराचे स्वप्न पूर्ण झाले

 

‘घर...जिथून आपल्या आयुष्याची गोष्ट सुरु होते, आयुष्याला एक वेगळे वळण येते’. घर हे आईच्या मायेसारखंच असतं. घरातूनच प्रेमाला, इच्छा-आशा, स्वप्नांना सुरु होते. प्रत्येकाला आपल्या घराविषयी प्रेम आणि घराकडे लवकर जायची ओढ असते.  बरेच जण आपल्या स्वत:च्या हक्काचे घर असावे असे सुंदर स्वप्न पाहत असतो आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत पण घेत असतो.

आज आम्ही तुम्हांला अशा कलाकाराविषयी सांगणार आहोत जो महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला मनापासून हसवतो. विशेष ओळख करुन ने देता सर्वांना कळलं असेल की आम्ही अभिनेता सागर कारंडेविषयी बोलतोय.

झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या मनोरंजनाच्या मालिकेतून घराघरांत पोहचलेला अभिनेता सागर कारंडे याचे स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

सागर कारंडेच्या नवीन घरी पूजा करण्यात आली आणि त्याला शुभेच्छा देण्यासाठी चला हवा येऊ द्यामधील अतरंगी साथीदारांनी सागरच्या नवीन घरी हजेरी लावली.

सागर कारंडेने त्याच्या नवीन घराचे फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आणि “नवीन घर...नवीन सुरुवात” असे कॅप्शन फोटोंना दिले आहे.

www.marathidhamaal.com/ तर्फे अभिनेता सागर कारंडेला त्याच्या नवीन घरासाठी खूप खूप शुभेच्छा!