‘बुध्दा इन अ ट्रॅफिक जाम’ मध्ये पल्लवीचा अभिनय आणि गाणं

 

एका ठिकाणी मराठी चित्रपटाविषयी कौतुक होत आहे तर दुस-या ठिकाणी मराठी कलाकार हिंदी सिनेसृष्टीत अप्रतिम कामगिरी करत आहे.  विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘बुध्दा इन अ ट्रॅफिक जाम’ हा चित्रपट आज प्रदर्शित होत आहे.  या चित्रपटात अभिनेत्री पल्लवी जोशीने अभिनय केला आहे आणि चांद रोझ हे गाणं देखील गायलं आहे.

याच चित्रपटातील फैज अहमद फैज ने लिहिलेल्या ‘चांद रोझ’ या गाण्याला पल्लवी जोशीने आवाज देऊन हिंदी सिनेसृष्टीत गायिका म्हणून पदार्पण केले आहे. या चित्रपटात अनुपम खेर यांच्या पत्नीची भूमिका पल्लवीने साकारली आहे.  मराठी चित्रपट ‘रिटा’, ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ नंतर  पल्लवीने ‘बुध्दा इन अ ट्रॅफिक जाम’ या चित्रपटाच्या निमित्ताने कमबॅक केले आहे.