प्रियांका चोप्रा मराठी चित्रपटात गाणार?

 

सध्या मराठी चित्रपटसृष्टी सर्वांचे लक्ष स्वत:कडे वेधून घेत आहे. मराठी चित्रपटांना भारतात आणि परदेशात कौतुकाची थाप मिळत आहे. अनेक व्यक्ती आता मराठी चित्रपट बनवू इच्छितात आणि मराठी सिनेसृष्टीत नवीन प्रयोग पाहण्यासाठी प्रेक्षक पण आतूर आहेत.

बॉलिवूड आणि हॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा लवकरच 'व्हेंटिलेटर' या मराठी चित्रपटाच्या निर्मितीतून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. प्रियांका चोप्राच्या 'पर्पल पेबल पिक्चर्स प्रॉडक्शन' बॅनर अंतर्गत 'व्हेंटिलेटर' या चित्रपटाची निर्मित करण्यात आली आहे.  तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शक राजेश मापुसकर आहेत व निर्मात्या मधू चोप्रा या आहेत.  

'व्हेंटिलेटरच्या' निमित्ताने राजेश मापुसकरांचे मराठीत पदार्पण

http://www.marathidhamaal.com/news/priyanka-chopras-purple-pebble-pictures-ventilator-coming-soon

आता सर्वत्र अशी चर्चा आहे की, 'व्हेंटिलेटर' या मराठी चित्रपटात प्रियांका चोप्रा गाणं गाणार आहे. पण अजून पूर्ण सत्य कळलेलं नाही की प्रियांका चोप्रा नक्की कोणत्या चित्रपटात गाणार आहे, मराठी कि हिंदी, पण हे मात्र नक्की की तिच्या आवाजातील गाणं हे चित्रपटाचं प्रमोशनल गाणं असणार आहे.

नक्की ते गाणं कोणतं, रेकॉर्डिंगला केव्हा सुरुवात होणार याविषयी अजून कोणतीही माहिती सांगण्यात आलेली नाही.   पण हे मात्र नक्की मराठी चित्रपटातून मराठी प्रेक्षकांचे पण मन पीसी जिंकणार.