खाजगी गुप्तहेर अस्मिता ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये

 

वार सोमवार-मंगळवार आणि वेळ ९:३० यांचा धम्माल, मनोरंजक मिलाफ म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’.  १ तास मनोरंजन करणा-या ‘चला हवा येऊ द्या’ या शो मध्ये कोणता चित्रपट, मालिका किंवा नाटक प्रमोशनसाठी येतंय याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता सर्वच प्रेक्षकांमध्ये असते.  आज या मंचावर ‘शोधलं की सापडतं, गुन्ह्याला माफी नाही’ असं सांगणारी खाजगी गुप्तहेर अस्मिता तिच्या टीमसोबत येणार आहे. 

खाजगी गुप्तहेर अस्मिता आणि तिचे सहकारी चला हवा येऊ द्या च्या मंचावर काय करतात आणि आपले लाडके कलाकार अस्मिता टीमशी कशी धमाल उडवतात हे आजच्या (१६ मे) भागात पाहायला मिळणार आहे.  तर बघायला विसरु नका ‘चला हवा येऊ द्या’ रात्री ९:३० वाजता फक्त झी मराठीवर.