मराठमोळा पुष्कर थिरकणार सुपर हॉट म्युझिक व्हिडियोमध्ये

 

अभिनेता पुष्कर जोग याची ओळख तर मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत दोन्हींकडे आहे आणि त्याने त्याच्या अभिनयाने दोन्हीकडे आपले फॅन वर्ग वाढवला आहे. आता त्याच्या फॅन्ससाठी एक गूड न्यूज आहे की ‘घाटी ट्रान्स’ या म्युझिक व्हिडीयोमध्ये युके मॉडेल अॅशली एमा सोबत थिरकताना दिसणार आहे.  या गाण्याविषयी तर चर्चा नक्कीच होणार पण पुष्करने यासाठी घेतलेल्या मेहनतीसाठी त्याच्या कोरिग्राफर अँडीने त्याचे कौतुक केले.

पुष्कर जोग विषयी रेमो डिसूझाचा असिसटंट अँडी सांगतो, “जेव्हा पहिल्यांदा मी पुष्करला भेटलो तेव्हाच मला कळलं की हे शूट चांगलं होणार आहे.  या गाण्याविशयी तो अतिशय उत्साही होता.  पुष्कर सारखा तल्लख, हुशार अभिनेता आणि नॅचरल डान्स टॅलेंट कलाकार शोधणं अगदी दुर्मिळ आहे.”

‘घाटी ट्रान्स’ या गाण्याचे दिग्दर्शन सचिन गुप्ता यांनी केले आहे तर जसप्रीत जॅझ आणि सोनू कक्कर यांनी हे गाणं गायलं आहे आणि या गाण्यावर रेमो डिसूझाचा असिसटंट अँडीने डान्स स्टेप्स् बसवल्या आहेत.

भारतात इंटरनेटवरील लोकप्रिय सेलिब्रिटी सनी लिओनी नंतर आता अॅशली मा या मॉडेलचा नंबर लागतो. युके मधील हॉट आणि बोल्ड मॉडेल म्हणून अॅशली माची ओळख आहे. युके आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील टॅबलॉईड आणि मासिकांसाठी तिने फोटोशूट केले आहे.  लवकरच ही फॉरेन मॉडेल एका सुपर हॉट म्युझिक व्हिडीयोच्या माध्यमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. ‘घाटी ट्रान्स’ म्युझिक व्हिडियो येत्या जूनमध्ये प्रदर्शित होणार आहे.