पुष्कर श्रोत्री आणि मिसेस होम मिनिस्टरसोबत मनसोक्त गप्पा

 

महाराष्ट्रातील सर्व वहिनींचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर आणि सर्वांचा आवडता कार्यक्रम होम मिनिस्टर गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. सर्व वहिनींची या कार्यक्रमाविषयीची आवड आणि आदेश बांदेकर यांचं निवेदन यामुळे हा कार्यक्रम सर्वांना हवाहवासा वाटतो.

या कार्यक्रमामध्ये सामान्य व्यक्ती ते सेलिब्रिटी यांच्या आयुष्यातील आठवणींना उजाळा देण्यात येतो. आता येत्या रविवारी लवकरच अभिनेता पुष्कर श्रोत्री त्यांच्या पत्नीसह होम मिनिस्टरच्या एपिसोडमध्ये दिसणार आहेत. 

२५ सप्टेंबर रोजी रविवारी सायंकाळी ७ वाजता होम मिनिस्टर मध्ये पाहा अभिनेता पुष्कर श्रोत्री च्या पुष्कळ गप्पा आणि अनुभवा त्यांच्या आठवणी फक्त आपल्या झी मराठी वाहिनीवर-

हा ‘होम मिनिस्टर’चा एक तासाचा विशेष भाग पाहायला विसरु नका.