ऐकलंत का ...राधिकाचा क्रश कोण आहे !

 

बोल्ड आणि ब्युटिफुल अभिनेत्री राधिका आपटे सध्या यशोशिखरावर आहे. या ‘लय भारी’ फेम अभिनेत्रीने अनेक हिट सिनेमे दिले आहेत. आगामी ‘मांझी-द माऊंटन मॅन’ सिनेमातील तिच्या भूमिकेचंही सर्वत्र कौतुक होत आहे.

सर्वांनाच शाळेत किंवा कॉलेजमध्ये एखाद्याबद्दल आकर्षण वाटतं असतं. आपल्या राधिकाबाईंचंही तसंच आहे. बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खान म्हणे तिचा टीनएज क्रश आहे.

राधिकाने सोशल नेटवर्किंग साईटवर नुकतीच एसआरकेच्या आगामी सिनेमाबद्दल प्रतिक्रिया दिली आणि चक्क एसआरकेने ती वाचून तिला धन्यवाद दिले. तसेच तिच्या कामाचे कौतुकही केले. आता काय राधिकाबाईंचा आनंद गगनात मावत नसेल.